पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात एका तरुणाने पोलीस आपण सांगेल तशी तक्रर नोंदवून घेत नाही म्हणून पोलीस स्टेशनसमोरच स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. काही दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली होती. रोहिदास जाधव असं पेटवून घेतलेल्या तरुणाचं नाव होतं. या घटनेनंतर त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
दिलेल्या तक्रारीवर पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकी समोर त्याने स्वतःवर डिझेल टाकून पेटवून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो तरुण ९० टक्के भाजला होता. त्याच्यावर सूर्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला आहे.
रोहिदास राहत असलेल्या ठिकाणी तेथील अन्य व्यक्तींकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता. त्या व्यक्तींशी गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे वाद सुरू होते. अशात त्याच व्यक्तींकडून काही दिवसांपूर्वी त्याला मारहाण झाली होती. झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेला होता. रोहिदासने संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नाही. कारवाईला होत असलेला उशिर पाहून रोहिदास आणखी संतापला आणि हताश झाला.
या संपूर्ण प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची तडफडकी बदली केली होती. याच प्रकरणी २ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे लोकसभा उमेदवारीच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ बाजी मारणार?
-खरंच महिला सुरक्षित??? पिस्तुलाचा धाक दाखवत केला बलात्कार
-धक्कादायक! दारुच्या नशेत नराधमानं फुटपाथवरील महिलेवर केला बलात्कार
-पोलीस काढणार गुंडांची ‘डिजीटल कुंडली’; दलात ‘क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट’ची स्थापना
-स्टंटबाजी करणं दोघांना पडलं महागात; पोलिसांनी ताब्यात घेत केली कायदेशीर कारवाई