पुणे : पुण्यातील गुन्हेगारी थांबता थांबेना. मावळ तालुक्यातील तळेगाव परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला. प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट तर लावलीच सोबतच तिच्या २ चिमुरड्यांना देखील इंद्रायणी नदीत जिवंत फेकून देण्याचा निर्दयीपणा केल्याचा प्रकार २२ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला आहे.
पुण्याच्या मावळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने शहराला हादरुन सोडले आहे. हे संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधमाचे मृत महिलेचा प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांनी केले आहे. या दोघांनाही तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी ६ जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आले होते. ६ जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या ५ आणि २ वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गर्भपासाठी घेऊन गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रेयसीचा ८ जुलैला मृत्यू झाला. याच दरम्यान तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक महिलेच्या कुटुंबियांनी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. दोन्ही चिमुरडे मोठ्याने रडू लागल्याने आरोपींनी दोघांनाही नदीत जिवंत फेकून दिले. सध्या पोलीस तिघांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या-