पुणे : राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीच्या जागावाटपासाठी तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असणारी पिंपरी विधानसभेची शिंदेंच्या शिवसेनेने मागणी करत आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. शिवसेनेने केलेल्या दाव्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
श्रीरंग बारणे यांनी अण्णा बनसोडे यांच्या बाबतीत मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आधी ही जागा आम्ही लढली होती, राष्ट्रवादीच्या उमेदवाराप्रती मतदासंघात नाराजी आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळायला हवी, या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा मतदार आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना देखील मी सुचित केलं आहे. हे पाहता महायुतीचा एक आमदार कमी होऊ द्यायचा नाही, म्हणून आम्ही पिंपरी विधानसभेची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा नक्की मांडतील’, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आमच्याकडे राहावा. या निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे, आमच्याकडे या जागेसाठी सक्षम उमेदवार असल्यामुळे आता ही जागा आम्ही खेचून आणेल. महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यातील कोणत्याही उमेदवाराला जागा मिळाली तरी आम्ही प्रामाणिकपणे त्याचा प्रचार करू, असेही श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबच्या चर्चेवर अश्विनी जगताप म्हणाल्या, ‘मी शरद पवारांना…’
-पुणे मेट्रोची रेकॉर्ड ब्रेक कमाई; एका दिवसात साडे ३ लाख गणेशभक्तांनी केला प्रवास
-पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक; कोणत्या २ बड्या नेत्यांना घेणार सोबत?
-महाविकास आघाडीत कोथरुडची जागा ठाकरेंकडेच; इच्छुकांपैकी कोणत्या शिलेदाराला मिळणार संधी?
-छत्रपती शिवाजी महाराजांचा २१ फुटी अश्वारूढ पुतळा; ‘शिवतांडव’चे सादरीकरण ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू