मावळ : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभेची निवडणूक होणार आहे. मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मागे लागलेल्या नाराजी नाट्यासह धुसफूस काही संपायचं नाव घेईना. बारणेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. त्यातच आता शहरात लागलेल्या महायुतीच्या होर्डिंगवर मावळ लोकसभा उमेदवाराचा फोटो, नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेत्यांचे फोटो, शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे छापण्यात आले आहे. या होर्डिंवरुन बारणेंच्या विरोधात असणारी धुसफूस पुन्हा एकदा दिसून येत आहे.
श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजप, राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ‘भाजप उमेदवाराने कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी’, यासाठी आग्रह धरला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, असे जाहीर वक्तव्य केले होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
-अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने फोडलं मडकं अन् बारामतीचं राजकारण पेटलं; पहा नेमकं काय झालं?
-‘सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार’; मोहोळांचं आश्वासन
-बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले