पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०२४-२५ या अर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला. महापालिकेतील २ वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने या अर्थसंकल्पावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची छाप पडली नाही. त्यातच या पुर्वीच्या भाजपच्या २ आमदारांच्या मतदारसंघांना झुकते माप मिळालं होतं. मात्र यावेळी ते तिन्ही मतदारसंघांना मिळाले आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे ३ विधानसभा मतदारसंघात भाजपचे अश्विनी जगताप आणि महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पिंपरी महापालिकेच्या ५८४२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये विकास कामांसाठी देण्यात आलेल्या १८६३ कोटी रुपयांचे भांडवल राज्यातील सत्ताधारी युतीचे शहरातील तिन्ही आमदार करण्याची दाट शक्यता आहे.
महापालिका बजेटमध्ये मतदारसंख्येचा विचार करता चिंचवडसाठी भोसरी आणि पिंपरीपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे. शहरात ८ क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यातील चिंचवड मतदारसंघातील कार्यालयांसाठी भोसरी व पिंपरीपेक्षा भरीव निधी देण्यात आला आहे.
गतवर्षाचे बजेट आले तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता होती. त्यामुळे त्या महापालिका बजेटममध्ये भोसरी आणि चिंचवडला विकासकामे आणि त्यांच्या तरतुदीसाठी निधी देताना झुकते माप मिळालं होतं.
दरम्यान, गेल्यावर्षी राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत सहभागी झाल्याने यावर्षीच्या बजेटमध्ये राष्ट्रवादीच्या आण्णा बनसोडेंनाही निधी मिळाला आहे. त्यांच्या मतदारसंघातील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी भरीव निधी देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?
-शिवाजीनगर पोलिसांची जबरदस्त कामगिरी; चोरी करुन कोयते बाळगणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
-भाजपचा ‘तो’ प्लॅन सक्सेस! मेधा कुलकर्णींसह राज्यसभेवर चव्हाण, गोपछडेंची बिनविरोध निवड
-पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त
-शिंदेंच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा हुकमी एक्का; मावळच्या मैदानात जोरदार लढत होणार!