पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागामध्ये एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे या अलिशान कारने दोघांना चिरडले. या अपघातामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळे खुलासे झाले आहेत.
या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियासह सर्व क्षेत्रामध्ये तसेच राज्यभरात उमटले आहेत. या मुलाची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणावरुन आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहण्याचे तसेच १५ दिवस ट्राफिक पोलिसांसोबत काम करण्याचे आदेश कोर्टाने दिले. यावरुन सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला. प्रकरण चिघळल्यानंतर अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधार गृहामध्ये करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची देखील पुणे क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली.
काय म्हणाले अमितेश कुमार?
“पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही. रक्त चाचणी अहवाल असो किंवा नसो हे प्रकरण असे आहे की, अल्पवयीन मुलाला हे माहीत होतं की दारु पिणे आणि अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालवणं यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही या प्रकरणात कसून तपास करतो आहोत तसंच ठोस पुरावे गोळा करत आहोत. तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.”
“अल्पवयीन आरोपीची पहिल्यांदा रक्ताची चाचणी (Blood Test) करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीची पुन्हा एकदा ब्लड टेस्ट झाली. या दोन्ही ब्लड टेस्टचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ब्लड टेस्टचे नमुने एकाच व्यक्तीचे आहेत की, नाही हे तपासून घेण्यास सांगितले आहे. हे दोन्ही रक्ताचे नमुने आरोपीचेच आहेत का, याची खात्री अद्याप फॉरेन्सिक लॅबकडून झालेली नाही”, असे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“करके बैठा मै नशे, इन माय पोर्शे…”; आरोपी वेदांत अग्रवाल रॅप करत देतोय शिव्या अन् आई म्हणतेय…
-‘पैसे खाल्ल्याशिवाय ‘हे’ होऊच शकत नाही’; रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवसांत पुन्हा उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
-‘पोलीस महानालायक असतातच…’; पुणे अपघातावरुन केतकी चितळे पोलिसांवर संतापली