पुणे : राज्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीप्रमाणेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची चुरस पहायला मिळाली. शिरुर लोकसभेत महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे विजय झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील यांचा १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव केला आहे.
आढळराव यांना केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. त्यामुळे आढळरावांना राष्ट्रवादीच्या आमदारांनीच रोखले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांना अजित पवार गटातील तसेच भाजपच्या आमदारांनी विरोध केला होता. त्यामुळे आढळराव पाटालांना पराभव मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील ‘काका विरुद्ध पुतण्या’ या लढाईत तुल्यबळ पाहिल्यास अजित पवार यांचीच ताकद जास्त दिसत होती. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, खेड-आळंदी– दिलीप मोहिते पाटील आणि हडपसरमधून चेतन तुपे असे ४ आमदार अजित पवार गटाचे आहेत. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने या विधानसभा मतदारसंघासाठी
गेल्या वर्षांपासून करणारे आढळराव यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत ही जागा शिवसेनेकडून राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे नक्की झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आयात उमेदवार नको म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तसेच नाराजही होते. आणि याच नाराजीचा परिणाम या निकालावरुन दिसून आला आहे.
दरम्यान, आढळराव पाटील यांना २०१९च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी पराभूत केले होते. याच पराभवाचा वचपा आढळराव पाटालांन काढायचा होता मात्र, पक्षांतर केल्याचा फटका आढळराव पाटलांना बसला असल्याचे दिसून आले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आढळराव यांना साडेनऊ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना एकच जागा; शरद पवार म्हणाले, ‘त्यांच्या राष्ट्रवादीचे भविष्य…’
-महाराष्ट्रात एनडीएला फटका का बसला? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘अजित पवार आमच्यासोबत…’
-मोहोळांनी गुलाल उधळला मात्र भाजपचे दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये, गणित नेमकं कुठं फसलं?
-मुळशीचा स्वाभिमान, अभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला; मोहोळांच्या विजयावर मित्राची प्रतिक्रिया