पुणे : पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत आहे. दररोज धक्कादायक घटना समोर येत असतात. पुणे शहराला विद्येचं माहेरघर तसेच सांस्कृतीक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर असा उल्लेख आज पर्यंत करण्यात आला मात्र आता याच पुण्याला गुन्हेगारीचा अड्डा म्हटलं जात आहे. या शहरात कधी कोयता गँग दहशत माजवताना दिसते. तर कधी थेट रस्त्यांवर हत्या, बलात्कार केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोड सुरु आहे. त्यातच पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणांकडून वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
अजय चित्रगुप्त बागरी, सुमीत भारत सितापराव असे अटक करण्यात आलेल्या २ आरोपींची नावे आहेत. मध्यरात्री येरवडा भागात ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती.
याबाबत एका ४० वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवर त्वरित अॅक्शन घेत पोलिसांनी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन तरुणांना अटक केली होती. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हे सत्र कधी संपणार? आणि सर्वसामान्यांनी आणखी किती हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न सर्वासामान्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सासवडमध्ये कांद्याच्या शेतात अफूची लागवड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
-“जबाबदारीच्या पदावर बसलेली लोक पोरकट बोलतात”; शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं
-“जरांगेंना शरद पवार, रोहित पवारांकडून मदत मिळते, त्यांचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे”
-पुण्यात बनवल्या जात होत्या बनावट नोटा; पोलिसांनी ६ जणांना केलं जेरबंद
-यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पुणे जिल्हयाला काय काय मिळालं? वाचा एका क्लिकवर