पुणे : जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील बहुचर्चित टेमघर धरण दुरुस्तीसाठी काल (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निधी मंजूर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या धरणाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३१५.५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. कारण या धरणाला बांधण्यासाठी लागलेल्या निधीपेक्षा जास्त निधी आता या धरणाच्या दुरुस्तीला लागणार आहे. तसेच या आधीही १०० कोटींपेक्षा जास्त निधी या धरणाच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला तरीही गळती काही थांबलेली नाही.
२००० साली टेमघर धरण सुमारे ३१४ कोटी रुपयांमध्ये बांधून पूर्ण झाले होते. धरण भरल्यानंतर या धरणाच्या भिंतीतून निकृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे दिसून आले. त्यावेळी या गळतीवरुन सरकारवर चांगलीच टीका झाली होती. नवीन धरणाची दुरुस्ती करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. आतापर्यंत दुरुस्तीसाठी तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करुनही आता पुन्हा दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी ३१५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या आधी १०० कोटी आणि आताचे ३१५ कोटी असा दोन्ही मिळून ४१५ कोटी रुपये खर्च दुरुस्तीवर होणार आहे. ३१४ कोटी निधीमध्ये पूर्ण धरण बांधून झाले होते. यातून बांधणीपेक्षा दुरुस्तीवर अधिक खर्च होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही गळती नेमकी धरणाला लागली आहे की निधीला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आमदार झाल्याचा आनंद साजरा करत हत्तीवरुन वाटले पेढे, अन्….; अजित पवारांचा ‘तो’ आमदार कोण?
-‘ऑपरेशन टायगर’साठी एकनाथ शिंदेंचं ‘मिशन पुणे’; ३ माजी आमदार लागले गळाला!
-Pune Froud: ब्रँडेड वॉच खरेदी करताय; आधी ही बातमी वाचा…
-फिट इन फिटू: अखेर ‘त्या’ महिलेची प्रसुती सुखरुप; आता बाळ्याच्या पोटातील बाळाचे काय?