पुणे : देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे राजगड येथून निघाताना त्यांचे हेलिकॉप्टर बिघडल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार हे सध्या महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा दौरा करत आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत. अशातच आज पवार पुण्याच्या राजगड दौऱ्यावरुन निघताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आता समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदारसंघातील वारजे येथील सभेसाठी शरद पवार हेलिकॉप्टरने जाणार होते.
हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघड झाल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरमधून उतरून बाय रोड पुण्याच्या दिशेने रवाना झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी हेलिकॉप्टर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेलिपॅडवर गर्दी केली.
महत्वाच्या बातम्या-
-Sholay | साऊथच्या ‘या’ चित्रपटाने दिली थेट ‘शोले’ला टक्कर; बॉक्स ऑफिसवर थलापथीचा धमाका
-Lok Sabha | ‘मतदानाच्या दिवशी कामगारांना फुल पगारी सुट्टी द्या’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
-हडपसरमध्ये आढळराव पाटलांची सरसी, रॅलीला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद
-“होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण…” शरद पवारांचे मोदींना खरमरीत उत्तर
-मावळात ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारांच्या गर्दीमुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढली