पुणे : राज्य मंडळाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या ५ लाख ९९ हजार ६४ विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या शुल्क परताव्याच्या प्रक्रियेला काही तांत्रिक अडचणी आल्याने समोर आले आहे. आधार नंबर चुकीचा असणे, खाते बंद असणे, खाते आधारकार्डशी संलग्न नसणे अशा प्रकारच्या अनेक तांत्रिक कारणांमुळे ८६ हजार ३५ विद्यार्थ्यांना शुल्कमाफीची रक्कम पोहचली नाही.
शुल्क परताव्याच्या प्रक्रियेसाठी पालक विद्यार्थांच्या आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा होणार होते. यासाठी तब्बल ६ वेळा मुदतवाढही देण्यात आली. अशातच दहावीच्या ३ लाख ४८ हजार ९४२ आणि बारावीच्या २ लाख ५० हजार १२२ विद्यार्थ्यांनी ही माहिती दिली होती. मात्र, यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क परतावा मिळाला नाही.
दरम्यान, शुल्क परताव्याच्या या योजनेसाठी राज्य सरकारकडून तब्बल ८ कोटी ९० लाख रुपयांचा निधी राज्य मंडळाला देण्यात आले होते. त्यापैकी तांत्रिक अडचणींमुळे ३ कोटी ९२ लाख ५६ हजार ५८० रुपयांचा निधी राज्य मंडळाकडे शिल्लक आहे. तांत्रिक अडचणी असल्यामुळे विभागीय मंडळाकडून तपशीलाची पडताळणी करण्यात येत असून उर्वरित विद्यार्थ्यांना शुल्क परतावा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार भाजपला धक्का देणार?; भाजपचे संजय काकडे पोहचले शरद पवारांच्या भेटीला
-Pune Drugs: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा ड्रग्ज प्रकरण उघडकीस
-‘नागपंचमीला गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…’; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला
-‘सरकार घाबरलंय त्यामुळे…’; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त
-भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?