Health Update : भारतात सर्वात जास्त लोक चहाप्रेमी आहेत. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच… या वाक्यात तथ्य आहे. चहा हा जवळपास प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. चहाचे शौकीन लोक दिवसातून वेळ काळ न पाहता अनेकदा चहा पितात. पण याच चहाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणाला कडक कडक चहा आवडतो, तर कोणाच्या चहा बनवण्याच्या विविध पद्धती असतात. साधा चहा, मसाला चहा, मलई चहा, असे अनेक प्रकार हल्ली सुरु आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का जर जास्त वेळ चहा उकळवला तर त्याचे आपल्या आरोग्यावर काय हानिकारक परिणाम होतात.
बऱ्याच जणांना कडक चहा हवा असतो. अधिक काळ उकळवलेला चहा पिणारे लोकही बरेच आहेत. जर तुम्ही दुधाचा चहा जास्त वेळ उकळत असाल तर सावधगिरी बाळगा, तर तुमच्या आरोग्यावर नक्कीच हानिकारक परिणाम होत असतात. चहा जास्त वेळ उकळणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. चहा तयार करण्यासाठी लागणारा वेळ आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे चांगला आणि कडक चहा पिताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आज आपण जाणून घेणार आहोत, जास्त उकळलेल्या चहाचे काय परिणाम होतात.
जास्त उकळलेला चहा विषारी बनतो असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. हे प्यायल्याने ॲसिडिटीची सर्वात मोठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आणखी अनेक समस्या उद्भवू शकतात. हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
चहा उकळायला किती वेळ लागेल? चहा बनवण्यासाठी नेहमी एक चमचा चहाची पत्ती पाणी किंवा दुधात घालाल तेव्हा ते किमान दोन मिनिटे चांगले उकळू द्या.
थंड पाण्यात चहाची पत्ती टाकणे टाळावी. पाणी उकळल्यानंतर चहाची पाने टाकणे केव्हाही चांगले. चहा दोन मिनिटांपेक्षा जास्त उकळू नये. चहाची पाने किंवा पत्ती नेहमी हवाबंद डब्यात बंद ठेवा. यामुळे त्याच्या पानांची चव दीर्घकाळ टिकते.
चहा उकळायला लागल्यावर त्यात दालचिनी आणि लवंगा टाकून त्याची चव चांगली येऊ शकते. आपल्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असते.
चहा बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रथम चहाची पाने पाण्यात व्यवस्थित भिजू द्या,नंतर पावडर टाका. या पद्धतीने चांगला चहा तयार करता येतो.
महत्वाच्या बातम्या-
-‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा…; पुणे अपघातावरुन मोहोळ-धंगेकरांच्यात तू-तू मै-मै!
-Pune Hit & Run: विशाल अग्रवालला बेल की जेल? वाचा कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit And Run | वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकचा प्रयत्न
-‘मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला गेलात?’ अंबादास दानवेंचा सुनिल टिंगरे, अजितदादांना सवाल
-‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप