पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणी आता पीडित तरुणीने धक्कादायक आरोप ककेले आहेत. एका शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर बस स्थानक प्रशासन आणि पुणे पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने आता पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्याच्या सचिवांना पत्र लिहून पीडितेने हे आरोप केले आहेत. यामध्ये तरूणीने आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर दोन वेळा बलात्कार केला. तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचे होते, मात्र आपण विरोध केल्याने तो पळून गेला. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली, असे या तरूणीने राज्याच्या सचिवांना पत्रामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर पुरुष पोलीस अधिकारी देखील आपल्याकडे चौकशी करत होते असेही पीडितेने म्हटले आहे.
आपल्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी वक्तव्ये आरोपीच्या बाजूने तसेच काही राजकीय नेत्यांनी केली. आपली बदनामी थांबवण्यात यावी आणि अशा वक्तव्यांवर बंदी घालण्याची मागणी आपण पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र दाद मिळाली नाही. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पीडितेने केली आहे.
राज्याच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात पीडितेने काय म्हटले?
“पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले होते की तुला तीन वकिलांचे नावे आम्ही सुचवू आणि त्यातून तुझ्या पसंतीचे वकील आम्ही नेमू. मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता, तुला यायला एक दिवस उशीर झाला असं पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले, म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? मला अजय मिसार यांच्या बद्दल आत्ताच आक्षेप घ्यायचे नाहीत, पण मी माहितीशास्त्र अभ्यासक्रम केला असल्याने माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की आपल्याला सांगू इच्छिते. घटनेच्यावेळी मी आरडाओरडा केला त्यानंतर माझा आवाज खोल गेला, आवाजच निघत नव्हता व त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने जखमी झालेल्या मुली मारून टाकण्यात आलेल्या गोष्टी आल्या मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले.”
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; ‘हे’ २ पोलीस अधिकारी होणार बडतर्फी?
-थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता
-वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पेटला? भूषणसिंहराजे होळकर काय म्हणाले? पहा व्हिडीओ
-Pune: भररस्त्यात लघुशंका, अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर