पुणे : पुणे शहराचे मुख्य बसस्थानक असणाऱ्या स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी अत्याचार केला. या धक्कादायक घटनेने पुणे शहरासह संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलिसांची १३ पथके तयार केली होती. आरोपी गाडेच्या शिरुरमधील गुनाट या गावात २०० हून अधिक पुणे पोलिसांचा फौजफाटा शोधण्यासाठी पोहचली होती. मात्र संध्याकाळ झाली तरीही तो ताब्यात आला नाही.
गुन्हा केल्यानंतर तब्बल ७५ तासांनंतर अखेर पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुस्क्या आवळल्या आहेत. दत्तात्रय गाडेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर तो फरार झाला होता. तोपर्यंत दत्तात्रय हा त्याच्या गावातच होता. गेल्या २ दिवासंपासून तहान-भूकेने व्याकूळ झालेला. बेचैन अवस्थेत त्याने अखे पाणी पिण्यासाठी आपल्या एका नातेवाईकाकडे आला. आणि तिथे त्याने मगरीचे अश्रू ढाळले.
बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास परिसरातील एका वस्तीवर वृद्धेच्या घरी पिण्याचे पाणी मागण्यासाठी तो गेला होता. त्या वेळी वृद्धेने ‘तू तर टीव्हीवर दिसत आहेस. तुला मी पाणी देणार नाही,’ असं म्हणत त्याला थारा दिला नाही. त्यानंतर तो तिथून पळून गेला, असे संबंधित वृद्धेने पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर गावातील ऊसात लपलेल्या गाडेने गुरुवारी रात्री अंधाराचा फायदा घेत बाहेर पडला आणि आपल्या नातेवाईकांचे घर गाठले.
‘मला खूप भूक लागली आहे. केलेल्या प्रकाराचा मला पश्चाताप झाला आहे, मला सरेंडर व्हायचं आहे’, असं म्हणत तो नातेवाईकांसमोर ढसाढसा रडू लागला होता. नातेवाईकांनी दत्ता गाडेला खायला न देता फक्त पाण्याची बाटली दिली. दत्ता गाडेने यावेळी नातेवाईकांना जे काही केलं ते चुकीचे आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असे सांगितले. पण त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन निघून गेला. यानंतर याच नातेवाईकांनी ग्रामस्थांना फोन करुन या घटनेची माहिती दिली आणि मग ग्रामस्थांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली. यानंतर पोलिसांची तपास पथकं तेथे दाखल झाली अन् आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दत्तात्रय गाडेच्या शोध त्याच्या शिरुरमधील गुनाट या गावात पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याच्या गुनाट गावी तो लपल्याचा संशय पोलिसांना होता. उसाच्या शेत पिंजून काढल्यानंतरही त्याला शोधण्यात पोलिसांना अपयश आले होते. अंधार पडल्यामुळे अन् परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं ही पोलिसांना परत येण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण मध्यरात्री त्याची माहिती मिळाळताच ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी त्या परिसरामध्ये सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार: पुणे पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुस्क्या आवळल्या; कुठे सापडला दत्तात्रय गाडे?
-Pune: स्वारगेट अत्याचार प्रकरणी पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया म्हणाले,…
-‘हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?’ शरद पवारांच्या आमदाराचा संतप्त सवाल
-फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी