पुणे : पुणे शहरासह राज्याला हादरुन सोडणारी घटना २५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट बसस्थानकामध्ये घडली होती. एका शिवशाही बसमध्ये पहाटे २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घटली अन् शहर हादरुन गेलं. अशातच पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळवले असताना देखील आरोपीचे वकील वाजिद खान बिडकर यांनी गाडेच्या जामीनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला असून धक्कादायक दावा केला आहे.
अॅड. वाजिद खान बीडकरांचा दावा काय?
अॅड. वाजिद खान-बिडकर यांनी जामीन अर्जामध्ये केलेल्या दाव्यानुसार, शारीरिक संबंधाची वेळ हा वैद्यकीयरीत्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. पीडितीमध्ये आणि आरोपीमध्ये जे शारीरीक संबंध झाले ते जबरदस्तीने नाही तर संमतीने झाले आहेत. पीडितीने जो जबाब दिला आहे त्यामध्ये जबरदस्तीने संभोग करणे म्हटले आहे. मात्र, ते अशक्य आहे. जे काही संबंध झाले ते संमतीनेच झालेत आणि संमतीने झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही, असे जामीन अर्जात वकिलांनी म्हटले आहे.
जर पीडितेने फिर्यादीमध्ये सांगितलं की ती जेव्हा स्वारगेट बस स्थानकात उभी होती तेव्हा आरोपीने तिला फलटणची गाडी दुसरीकडे लागली असल्याचे सांगितले होतं. तेव्हा तिच्या शेजारी एक जेष्ठ नागरिकसुद्धा होता. तो सुद्धा त्याच गाडीने जाणार होता. मग जेव्हा ती पीडित तरुणी गाडेसोबत गेली तेव्हा तो ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासोबत का गेला नाही.
ती फलटणला जाण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून एका एका तासाला एसटी बस आहे. हे माहिती असूनसुद्धा तरुणी अनओळखी माणसासोबत जाणे अशक्य आहे, असा दावा देखील जामीन अर्जात करण्यात आला आहे. तसेच स्वारगेट येथे सीसीटीव्ही कॅमेरे असून, हे फुटेज दाखल केलेले नाही. यावरून आरोपीने गैरकायदेशीर कृती केलेली नाही, हे सिद्ध होतं, असे वाजिद खान बीडकर हे जामीन अर्जात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारीच नाही, तीन महिन्यांपूर्वीच दिला होता राजीनामा
-‘लाडका दोस्त देशाचा लाडका…’; मुरलीधर मोहोळांचं भाषण ऐकून मित्राने केला कौतुकाचा वर्षाव
-शिंदेसेनेत जाताच धंगेकरांचे हिंदुत्व जागे, अजितदादांना म्हणाले “त्या पदाधिकाऱ्याला हाकला..”