पुणे : पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडणारं स्वारगेट बसस्थानकामधील ‘शिवशाही’मध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला अखेर ७५ तासांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास पुण्यातील शिरूर तालुक्यातील त्याच्या गुनाट गावातूनच पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या आहेत. पहाटे ३-४ वाजताच्या सुमारास पुणे पोलिसांनी दत्ता गाडेला स्वारगेट पोलीस स्टेशन आणले. मात्र पदड्यामागची कहाणी काही वेगळीच आहे. नराधम आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी नाही तर गावातील काही ग्रामस्थांनी पडकून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दाव करण्यात येत आहे.
आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्या प्राध्यापक गणेश गव्हाणे या तरुणाने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अटकेचा संपूर्ण थरारक घटनाक्रम सांगितला आहे. यावेळी त्याने ‘पोलिसांनी तपास करताना माझ्या भावाला मारल्याच्या रागातून आम्ही आरोपीला शोधले अन् पोलिसांच्या स्वाधीन केले’ असा दावा यावेळी गणेश गव्हाणेंनी केला आहे.
आरोपी दत्ताला नेमकं कोणी पकडलं?
“मागील ३ दिवसांपासून पोलिस आणि गुनाट गावातील लोक दत्ता गाडेचा शोधत होते. आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. गावकरी पोलिसांना मदत करत होते. यावेळी पोलिसांकडून गावकऱ्यांची विचारपूस केली जात होती. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चौकशी करताना पोलिसांनी माझ्या भावाला मारल्याच्या रागातून आम्ही आरोपीला शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. यावेळी गावात ज्या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवतो तेथील चंदनवस्तीच्या परिसरात दत्ता गाडे फिरत होता. त्यावेळी मी स्वत: त्याला पाहिलं, तो पळत असताना मी त्याला पकडलं आणि पोलिस अधिकाऱ्यांना कळवलं”, असे गणेश गव्हाणेंनी माध्यमांना सांगितले आहे.
दरम्यान, आरोपी दत्ता गाडे हा बलात्कार केल्यापासून त्याच्या गुनाट या गावी ऊसाच्या शेतात लपून बसला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची १३ पथके तपासात गुंतली होती. डॉग स्कॉड, ड्रोनद्वारे पोलिस गाडेचा शोध घेत होते. मात्र, तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
दरम्यान, अत्याचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर दबाव वाढत चालला होता. तसेच आरोपीचे राजकीय नेत्यांच्या बॅनरवर फोटो झळकल्याने त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि त्यांच्या पूर्ण पोलिस टीमला फ्री हँड देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. आज दुपारी २ वातजाच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार: पुणे पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुस्क्या आवळल्या; कुठे सापडला दत्तात्रय गाडे?
-Pune: स्वारगेट अत्याचार प्रकरणी पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया म्हणाले,…
-‘हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?’ शरद पवारांच्या आमदाराचा संतप्त सवाल