पुणे : स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणाने आज दिवसभर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेने पुणे शहरासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. आता दत्तात्रय गाडे या बलात्कार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर आला आहे. सध्या आरोपी गाडे हा फरार असून त्याने स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बससमध्ये बलात्कार केला.
पुणे पोलिसांनी सध्या त्याच्या चौकशीसाठी पोलिसांची ८ पथके तयार केली असून आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. या अगोदर दत्तात्रय गाडेवर शिरुर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे, साखळी चोरल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार हा स्वारगेट स्थानकात वावरत होता. सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी दत्तात्रयवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांची ८ पथके आरोपीचा शोध घेत असून राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल केले.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची मुजोरी, जन्मदात्या आईला केली मारहाण, नेमकं प्रकरण काय?
-गुंडगिरीला वैतागले कोथरुडकर; चौकाचौकात बॅनरबाजी, काय आहे बॅनरवर?
-पुण्यातील टोळीचा म्होरक्या, कुख्यात गुंड गजा मारणेनं गुन्हेगारीला सुरवात कशी केली?