पुणे : स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या अत्याचार प्रकरणाने पुणे शहरासह संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. स्वारगेट बसस्थानकावर एका शिवशाही बसमध्ये नराधम आरोपी दत्ता गाडे याने २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेला जवळपास आवठडा होत आला घटनेनंतर ७५ तासांत आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी आरोपीच्या गावकऱ्यांच्या मदतीने मुस्क्या आवळल्या. तेव्हापासून या प्रकरणाला अनेक फाट्या फुटत गेल्या. दररोज नववने खुलासे होत आहेत. अशातच आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग गेला आहे. गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्ता गाडेवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणात आरोपीकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे दिला आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर घटना घडलेल्या भागात विविध राजकीय पक्षांचे नेते पाहणीसाठी येत आहेत. राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांकडून या ठिकाणी आंदोलने केली जात असल्यामुळे खबरदारी घेत बस स्थानकावरील सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्वारगेट बस स्थानकातील आगारात बंद पडलेल्या बसेसमध्ये गैरप्रकार सुरु होते अशा बसेस देखील पोलिसांनी हटवल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-लॉजवर महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा अन् मग… पोलिसांनी नराधम दत्ता गाडेची कुंडली काढली
-काय करायचं ते कर पण… स्वारगेट प्रकरणात धक्कादायक माहिती, पीडितेने जबाबात सगळं सांगितलं
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महिला आयोगाची महत्वाची बैठक; चाकणकर काय म्हणाल्या?
-स्वारगेट अत्याचार: आरोपीच्या जाबाबातून धक्कादायक माहिती समोर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
-‘मी अत्याचार केला नाही, आमच्यात सहमतीने संबंध झाले’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा