पुणे : स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. या प्रकरणारुन स्वारगेट बस डेपोमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ज्या शिवशाहीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला त्या आणि तशाच काही दुरावस्थेत असलेल्या बस बसस्थानकात असून या बसमध्ये दररोज असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. या बसमध्ये अंर्तवस्त्रे, वापरलेली कंडोम तसेच त्याची पाकिटे, साड्या, जेन्ट पँट असे सर्व पहायला मिळाले. एकंदरीतच या बसेस म्हणजे लॉजचाच प्रकार असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत स्वारगेट बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक, पोलीस प्रशासन तसेच राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
“स्वारगेट बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना २२ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्र लिहून बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. पण यावर ना पोलिसांनी कारवाई केली ना विभागाकडून काही ठोस उपाययोजना केल्या गेल्या, परिणामी काल एका तरूणीवर अत्याचाराची घटना घडली हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?
स्वारगेट बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना २२ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्र लिहून बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. पण यावर ना पोलिसांनी कारवाई केली ना विभागाकडून काही ठोस उपाययोजना केल्या गेल्या, परिणामी काल एका तरूणीवर अत्याचाराची घटना घडली हे… pic.twitter.com/gv7pzcUgbY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2025
पोलिसांनी गुंडांवर काय कारवाई केली? पोलीस अन् स्थानिक गुंडांचे काय हितसंबंध आहेत? नेमक्या कुणाच्या फायद्यासाठी खाजगी एजंट्सना बसस्थानकात प्रवेश दिला जातो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सामान्यांना हवी आहेत. संबंधित घटनेस जबाबदार असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना निलंबित केले गेले पण त्यांच्याशी हितसंबंध जोपासणाऱ्या व्यवस्थेतील दलालांवर काय कारवाई होणार? की जनतेची मेमरी शॉर्ट असते असं म्हणून नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकत सरकार मोकळे होणार?”
दरम्यान, खासगी एजंट आणि तृतीयपंथ्यांकडून स्वारगेट बसस्थानकावरील प्रवासी तसेच राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे पत्र काही दिवसांपूर्वीच स्वारगेट बस डेपोकडून पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर आता याच बस स्थानकात झालेल्या या प्रकारामुळे बस डेपोतील तसेच पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. तसेच स्वारगेट बसस्थानकामध्ये अशाप्रकारच्या बसेसकडे आगारातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांचे दुर्लक्ष झालेच कसे काय? असा प्रश्न आता सर्व सामान्यांककडून विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी
-स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; राज्य परिवहन मंत्री मिसाळ काय म्हणाल्या?
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: फरार आरोपीचा फोटो व्हायरल, भावाला घेतलं ताब्यात