पुणे : गेल्या २ दिवसांपूर्वी पुणे शहरासह संपूर्ण राज्याला हादरुन सोडणारी घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानकावरील एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणाची सध्या राज्याच्या राजकारणामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. सामाजिक संघटनांकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी तब्बल १०० पेक्षा जास्त पोलिसांचा फौज फाटा त्याच्या शिरुरमधील गुनाट गावी पोहचला होता.
पुणे पोलिसांनी त्याच्या चौकशीसाठी त्याच्या सख्ख्या भावाला तसेच त्याच्या प्रेयसीला देखील ताब्यात घेतले आहे. गाडेची प्रेयसी ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रहिवासी आहे. दत्ता तिला अनेकदा स्वारगेटला भेटण्यासाठी बोलवत असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान ही माहिती मिळाली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा त्याच्या प्रेयसीला तिच्या आणखी एका मैत्रिणीसोबत पॅचअप करुन दे म्हणून तगादा लावला होता. त्यामुळे दत्ता गाडेने महिलांवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचा राजकीय फ्लेक्सवर फोटो लावण्यात आला आहे. शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर दत्तात्रय गाडेचा फोटो आहे.. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर हा आरोपी दत्ता गाडे याचा फोटो लावण्यात आला आहे. अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवर गाडे याचा फोटो आल्यानं आरोपी दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: स्वारगेट अत्याचार प्रकरणी पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया म्हणाले,…
-‘हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?’ शरद पवारांच्या आमदाराचा संतप्त सवाल
-फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी
-स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; राज्य परिवहन मंत्री मिसाळ काय म्हणाल्या?