पुणे : पुणे शहरात स्वारगेट एसटी आगारामध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात ७५ तासांनी फरार झालेल्या आरोपी नराधम दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडे याचा सध्या पुणे पोलिस तपास करत आहेत. स्वारगेट बस स्थानकावर दत्ता गाडे हा पोलिसांच्या गणवेशात फिरत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
पोलीस कॉन्टेबल असल्याचे सांगत दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकावरील प्रवाशांना गंडा घालत होता. तसेच गाडे पोलिस असल्याचे सांगून एसटी स्थानक परिसरात मिरवत असल्याचे वृत्त त्याच्या अटकेपूर्वीच प्रसिद्ध झाले होते, त्याच पुरावा यानिमित्ताने मिळाला आहे. पोलिसाच्या पोशाखातील त्याचा फोटो हाती लागल्याने त्यांच्यावर याप्रकरणी आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणावरुन आता दत्ता गाडे सारख्या सराईत गुन्हेगाराकडे पोलिसांचा गणवेश आला कसा? हा सवाल उपस्थित हो आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने त्याच्या ओळखीतील पिंपरी-चिंचवड परिसरातील पोलीस दलाच्या एका कॉन्टेबलचा गणवेश घातल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. दत्ता गाडे सराईत गुन्हेगार असून तो शिरुर परिसरातील लॉज बाहेर महिलांचे छुपे व्हिडीओ काढत असल्याचे तपासात आढळले आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवून त्यांचे व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा, अशी माहिती देखील समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! एक दिवसाच्या बाळाचा मृतदेह कब्रस्तानातून गायब; पुण्यात नेमकं काय घडलं?
-साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?
-पुण्यात नेमकं चाललंय काय? खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण
-धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं आता आमदारकीही जाणार? धक्कादायक माहिती आली समोर