पुणे : पुणे शहर विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर. या शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढती लोकसंख्या वाढते शहरीकरण यासोबतच गुन्हेगारी देखील तिकक्याच झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात अनेक विविध गुन्हे घडताना दिवसेंदिवस सुरु आहेत. एकीकडे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. तर दुसरीकडे आरोपी कायदा आणि सुव्यवस्थेला न जुमानता अपराध करत आहेत. स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे सध्या संपूर्ण राज्याला हादरुन सोडले आहे. तसेच या बस डेपोचे भीषण वास्तव समोर आले आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. दत्तात्रय गाडे याचे शिरुरच्या आजी माजी आमदारांसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शिरुरचे माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार यांच्या बॅनवर तसेच काही कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होत आहेत.
तसेच शिरुरचे अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासोबत देखील त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच सध्या आरोपी गाडेचे व्हॉट्स अॅप प्रोफाईल हे देखील ज्ञानेश्वर कटके यांचेच असल्याने या प्रकरणी आता अनेक चर्चा रंगत आहेत. यावर मात्र, ‘माझा दत्तात्रय गाडेशी काहीही संबंध नाही’ अशी प्रतिक्रिया शिरूरचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर काटके यांनी दिली आहे..
आणखी काय म्हणाले माऊले कटके?
शिरूर हवेली मतदारसंघातील अनेक लोक मला विकास कामांच्या निमित्त भेटत असतात. हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे, त्यामुळे भेटणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेशी माझा कुठलाही संबंध नाही. संबंधित आरोपीच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा आणि गाडे या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे, असे माऊली कटके यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आरोपी नराधम दत्तात्रय गाडे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पुणे पोलिसांनी पोलिसांची ८ पथके तयार केली होती. ती आता वाढवली असून आता १३ पथके तयार केली असून तब्बल १०० पोलिसांचा फौज फाटा शिरुरच्या गनाट या आरोपीच्या गावात पोहचला आहे. पुणे पोलिसांनी आता या आरोपीला शोधणाऱ्यास १ लाख रुपयांच्या रोख रकमेचे बक्षिस जाहीर केले आहे. शेवटी आरोपी लवकरात लवकर पोलिसांना सापडावा आणि त्यावर कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: स्वारगेट अत्याचार प्रकरणी पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया म्हणाले,…
-‘हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?’ शरद पवारांच्या आमदाराचा संतप्त सवाल
-फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी
-स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; राज्य परिवहन मंत्री मिसाळ काय म्हणाल्या?