पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचार प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीवर देखील अनेक तथ्यहीन तसेच बदनामीकारक आरोप करण्यात आले. त्यामुळे पीडित तरुणीला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. यावर आता ‘माझ्या या बदनामीला जबाबदार कोण’ असा प्रश्न पीडितेने गुन्हे शाखेच्या पोलिसांना विचारला आहे.
त्यावर अधिकारी निरूत्तर झाले. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता. यावेळी पीडित तरूणीने प्रश्न विचारला त्यावर अधिकारी देखील निरूत्तर झाल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेने आतापर्यंत झालेला तपासाची माहिती घेतली. तसेच पुढील दिशा देखील ठरवली आहे.
आरोपी नराधम दत्ता गाडेला पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागरेट पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. दत्ता गाडे याने स्वारगेट अत्याचारापूर्वी कोणकोणते गुन्हे केले? याबाबत तपास सुरु असून वारंवार धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात ३ तास कसून चौकशी केली आहे. मात्र, गाडे पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. गाडेचा मुक्कम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथककाकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक दावे करण्यात आले होते, त्यानंतर आता पिडितेने देखील माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, एकीकडे राज्य, केंद्र सरकार महिला सुरक्षेसाठी कठोर नियम करत महत्वाची पाउले उचलताना दिसत आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा कसलाही धाक मनात न ठेवता नराधम महिला, मुलींची छेड काढत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबतही असाच छेडछाडीचा प्रकार घडल्याचे समोर आले होते. यावरुन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर असल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याला मिळणार आणखी एक आमदार; मानकर अन् मुळीकांच्या नावाची जोरदार चर्चा
-‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ
-रात्री बाराचा ठोका अन् गुन्हेगारांनी केलं पोलिसांचं बर्थ-डे सेलिब्रेशन; बीडलाही टाकलं मागं
-पुण्यात आढळला मानवी हाडांचा सांगाडा, मोबाईल अन् आधारकार्डही; पुढे काय घडलं?