पुणे : गेल्या दोन दिवसांपूर्वी (३ ऑक्टोबर) बोपदेव घाटामध्ये २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्यसह आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून तपास चालू असताना त्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर आता पोलीस तपासातून संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून आरोपींचा शोध सुरु आहे.
पीडित तरुणी आणि तिचा मित्र दोघेजण रात्रीच्या सुमारास बोपदेव घाटामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या दोघांना काही तरुणांनी आम्ही मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत धमकावले आणि तिच्या मित्राचे कपडे काढून त्याला झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर मुलीवर तिघांनी अत्याचार केला. अशी तक्रार पीडित मुलगी आणि तिच्या मित्राने पोलिसांत केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासावेळी त्या ठिकाणी कोणत्याच मोबाइलला रेंज नसल्यामुळे आणि घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. परंतु, बोपदेव घाटातून सासवडच्या बाजूला जाताना तीन संशयिताचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण १५ मिनिटांनी हे संशयित एका ठिकाणी थांबले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पुढे तपास करत संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले, असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांनी टिंगरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…
-आधी बांधलं मोदींचं मंदिर, आता दिली भाजपला सोडचिठ्ठी; नेमकं काय प्रकरण?
-‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अन्….’; ‘या’ माजी मंत्र्याने केला मोठा दावा
-हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार, पण कधी? पाटील म्हणाले, ‘तो निर्णय …’
-हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सांगितलं फडणवीसांसोबतच्या बैठकीत सत्य