पुणे : भाजप कार्यकारिणी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांवर सडकून टीका केली. त्यानंतर आज शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या टीकेला उत्तर देताना चांगलेच ताशेरे ओढले आहेत. अमित शहा यांचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी तडीपार असा देखील केला.
‘हिंमत असेल तर लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडा’
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे दोघेही एकसारखेच अघळपघळ बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली, ते पाहता फडणवीस हेच फेक नरेटिव्हचे सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात. भाजप कायमच हिसा करतो. हिंदू हिंसक नाहीत. भाजप आणि आरएसएस म्हणजे सकल हिंदू अशी भाजपचे समजूत आहे. राज्यात जातीय विषपेरणी करू नका, आरक्षणाचा तोडगा काढा. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा. तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
‘तडीपार (अमित शहा) लोकांनी आम्हाला शहाणपणा सांगू नये’
अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंचा औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष असा उल्लेख केला. यावरुन सुषमा अंधारे आक्रमक झाल्या. ‘तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचे सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये’, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका
-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले