Sushant Singh Rajput : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आज चौथी पुण्यतिथी आहे. हा दिवस सिनेप्रेमी आणि बॉलीवूड टीव्ही स्टार्ससाठी काळा दिवस मानला जातो. या दिवशी सुशांतने जगाचा निरोप घेतला होता. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
आज सर्वजण सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याची आठवण काढत आहेत. अशा परिस्थितीत त्याची जवळची मैत्रीण आणि ‘पवित्र रिश्ता’ची सहकलाकार अभिनेत्री अंकिता लोखंडे जैन हिने त्याच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांतसोबतचा स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे.
सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त, अंकिताने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे, अंकिताने यावर कोणतेही कॅप्शन लिहिले नाही, परंतु ‘कल हो ना हो’ चित्रपटातील शंकर-एहसान-लॉय यांचे ‘हार्टबीट’ हे गाणे फोटोवर टाकले आहे.
View this post on Instagram
१४ जून २०२० रोजी, सुशांत मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला आहे, असे सांगण्यात आले की, त्याने आत्महत्या केली होती. अभिनेत्याला जाऊन आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी देखील अभिनेता अजूनही आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्या आठवणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: न्यायालयातून महत्त्वाची अपडेट आली समोर, आज नेमकं काय घडलं?
-कांद्याने महायुतीला रडवले! अजित पवारांनी थेटच सांगितलं कुठे गणित चुकलं
-संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका; अजित पवार म्हणाले, ‘लोकशाहीत…’
-पावसाळ्यात दूध पित आहात? होऊ शकते नुकसान, वाचा काय परिणाम होतात?
-सुषमा अंधारे यांनी दिलेल्या ऑफरवर रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘त्या माझ्या मैत्रीण…’