पुणे : लोकसभा निवडणुकीच्या ४ टप्प्यातील मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यात ४ लोकसभेच्या जागांसाठी मतदान पडले. या निवडणुकीच्या ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्या आधीच कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करत शहरात, मतदारसंघामध्ये बॅनरबाजी केल्याचे पहायला मिळाले आहे. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे शहरात ठिकठिकाणी खासदार असा उल्लेख केल्याचे बॅनर पहायला मिळाले.
पुण्यानंतर आता महाविकास आघाडीच्या उमेदवार बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा ‘खासदार’ असा उल्लेख केलेले बॅनर पहायला मिळाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अटीतटीचा असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी टाळण्याचा दिसून येत होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघात गुलाल आपलाच म्हणत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भोरमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन करत ‘गुलाल आपलाच’, या शीर्षकाखाली भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे यांनी पुणे बेंगलोर हायवे लगत शिंदेवाडी परिसरामध्ये बॅनर लावल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून सुरू झालेली ही पोस्टरबाजी नंतर मावळ, शिरूर मध्येही दिसून आली.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati News : बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार भिडणार? काय आहे राजकीय परिस्थिती
-तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आजच ही सवय बदला, आरोग्यासाठी ठरते हानिकारक
-पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स
-बड्या बापाच्या बिघडेल मुलाचा ‘कार‘नामा; भरधाव कारने दोघांना चिरडले! तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू
-Baramati | अजितदादांचं बॅक टू वर्क सुरु; सकाळी केली विकास कामांची पाहणी