पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीच्या महाविकास आघाडी आणि महायुती हे एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित प्रचारही करताना दिसत आहेत. प्रचाराचा दुसरा, तिसरा टप्पा सुरु असताना नाराजी नाट्य थांबताना पहायला मिळत नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने भोरमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट नाराज झाल्याचे समोर आले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी चक्क सुप्रिया सुळे दौरा अर्धवट सोडून नसरापूरमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली. असे असले तरी नाराजी पुर्णपणे दूर झाली नसल्याचे बोलले जाते. सुप्रिया सुळे यांचा शुक्रवारी भोर तालुक्यातील गावभेट दौरा झाला.
“भोर मतदारसंघातील पुढील विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटेच असतील. थोपटे आणि त्यांचे पदाधिकारी सहकार्य करतात. त्यांच्यापेक्षा १० टक्के मेहनत विधानसभेला आम्ही करू. महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय आम्ही स्तब्ध बसणार नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुळेंच्या याच वक्तव्यामुळे भोर विधानसभेत महाविकास आघाडीत ठाकरे गटात नाराजीचा सूर उमटल्याचे पहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
-प्रत्येक संकटात परमेश्वर साथ देतोच! जीवन सुखकर बनवतील असे स्वामी समर्थांचे उपदेश
-“भाजपचे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप”- मुरलीधर मोहोळ
-देशात पुणे, मुंबईमध्ये सर्वाधिक घरांची विक्री; गेल्या तीन महिन्यात १ लाखांपेक्षा जास्त घरे विक्री