पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दोन गट पडले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावरुन राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे.
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा असा बॅनर लागला होता. बॅनरवर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेची बारामतीसोबतच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘शाईफेक नेमकी कोणी केली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हे जे केलंय ते चुकीचं आहे. कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाही फेकणं हे अतिशय चुकीचं आहे’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असण्याची चर्चा तुफान रंगत आहे. त्यावरही आता सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. ‘देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे मात्र तो दिलदार असला पाहिजे. लोकांना दम देणं ह्या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास
-‘आधी साधी विचारपूस पण केली नव्हती आता मात्र…’; अजित पवारांची बोचरी टीका
-“ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्याकडून काढला अन् दुसऱ्याला दिला असं देशात कधीच घडलं नव्हतं”
-सुनील देवधरांनी मुहूर्त साधला! बाईक रॅलीच्या माध्यमातून पुण्येश्वराचा नारा देत वातावरण निर्मिती
-“महाराष्ट्र या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”- शरद पवार