पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व पक्षांचे सर्व नेते सज्ज झाले आहेत. त्यातच राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. १४ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये जन सन्मान रॅली आयोजित केली होती. ही सभा आटोपली आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर काल राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या शरद पवारांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदी बागेत गेल्या होत्या. त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी काल सुप्रीम कोर्टात होते. उद्धव साहेब, पवार साहेबांकडून पक्ष, चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतले. त्या बद्दलची ही केस आहे. आम्ही पाठपुरावा करतोय. सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानते. आमचा युक्तीवाद त्यांनी ऐकून घेतला. आम्हाला ऑगस्टची तारीख दिली आहे. केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बोलतात. आमच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. दोन्ही बाजूंचे वकील आमचेच आहेत. क्लायंट कधी कोर्टात दिसत नाही. अदृश्य शक्ती यंत्रणा चालवते” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असे केले नाही, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाची आहेत. सत्ता, पैसा येतो-जातो शेवटी नाती महत्त्वाची असतात.”
महत्वाच्या बातम्या-
-शिक्षण संस्थांनी मुलींना प्रवेश नाकारला तर….; चंद्रकांत पाटलांचा शिक्षण संस्थांना इशारा
-विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मुर्ती विठ्ठलाची; आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?
-पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…
-विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’ची स्वच्छता सेवा; बीव्हीजीचे ४०० स्वच्छता दूत सज्ज