पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची मोठी घोषणा केली. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
‘हर्षवर्धन पाटील यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत.हर्षवर्धन पाटील हे पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते, मात्र आमचे संबंध कायम होते’, असे सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर म्हणाल्या आहेत.
‘हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील, तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की, आपल्याला उमेदवारी मिळावी. मात्र, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच जे नाराज आहेत त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करू’, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाटील वाजवणार ‘तुतारी’; पत्रकार परिषद घेत जाहीर केला निर्णय
-हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? पवारांचे निष्ठावंत दुखावले, मानेंची आक्रमक भूमिका
-अंकिता पाटील कापणार भाजपचे दोर; आजच देणार पदाचा राजीनामा
-पुण्यात महिला असुरक्षितच; मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीसोबत….
-‘झापूक-झुपूक’नंतर आता ‘डंके की चोटपर’; गुनरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात