पुणे : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नुकतेच अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. त्याच लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांची लाडकी बहिण खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे.
विधानसभेची निवडणूक २ ते ३ महिन्यावर अली आहे. त्यामुळं आता जुमल्यांचा पाऊस पडणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. लाडकी बहिण योजना चांगली आहे, मात्र, त्यामध्ये अटी शर्ती टाकल्या आहेत. खरंच योजना किती महत्वाची आहे, याचा अभ्यास सुरु आहे. यामध्ये भष्ट्राचार होऊ नये, योजनेचं स्वागत केले पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या आहेत.
‘अजित पवार यांच्यावर जे भष्ट्राचाराचे आरोप झाले, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे’, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझ्या तिन्ही बहिणीवर रेड झाली होती, त्याला कोण जबाबदार आहे. महायुतीने मोदींनी याचं उत्तर द्यावे. महाविकास आघाडी कशाला उत्तर देणार? असा सवालही यावेळी सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या…’; अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल
-वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? आज मोरेंचा मोर्चा ‘मातोश्री’वर
-लढणार आणि जिंकणार! भिमालेंच्या रील्सने तापले पर्वतीचे राजकारण