पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटामध्ये अद्याप काही गोष्टी स्पष्ट नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांची नावे दिली आहेत. त्याच आता आज सकाळपासून शरद पवार हा गट काँग्रेस पक्षात विलीन होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच आज शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदी बागेत महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला शरद पवार यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल देशमुख यांच्यासह राज्यातील शरद पवार गटाचे अन्य नेते उपस्थित होते. मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला सुप्रिया सुळे यांनी पुर्णविराम देत मंगलदास बांदल यांच्या वक्तव्याचे खंडण केले आहे.
‘मंगलदास बांदल यांच्यावर पक्षाची कोणती जबाबदारी आहे? मला जयंत पाटील यांना विचारावे लागणार आहे. परंतु कोणत्या राष्ट्रवादी संदर्भात हा विषय आहे. कारण सध्या दोन राष्ट्रवादी आहेत ना? मला याबाबत काही माहीत नाही’, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांची नावे दिली आहे. कपबशी, वडाचे झाड अन् शिट्टी या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे. आम्ही त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. एका अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष काढून घेतला आहे. पवार साहेबांनी कुठलाही पक्ष घेतला नाही, तर स्वतः पक्ष काढला आहे. यामुळे आयोगाचा निर्णय आम्हाला अयोग्य आणि चुकीचा वाटला’, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘शरद पवार’ गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पुण्यात बैठक; अनिल देखमुखांची प्रतिक्रिया
-Big Breaking | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील या ३ नावांवर शिक्कामोर्तब
-राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन???
-२०१९ला विधानसभेत मेधा कुलकर्णींना नाकारलं आता जाणार थेट राज्यसभेत??
-डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनवणी लवकरच होणार; सीबीआयचा युक्तीवाद संपला