पुणे : गेल्या दिवसांपासून पुणे शहरातील काही दिवसांपासून शहरात मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याने गच्च भरले आहेत. शहरातील या समस्यांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी साठले होते. सुप्रिया सुळे यांनी पाणी तुंबलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुणे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन या संदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर त्यांनी महापालिका प्रशासनाकडून वेळेत उपाययोजना झाल्या नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोणतेही नियोजन न करता घाईघाईने केलेल्या विकासकामांमुळे पुण्याची ही स्थिती झाली आहे. शहरात प्रशासनाकडून नालेसफाई झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात नालेसफाई झालेलीच नाही. टेंडर होवून देखील नालेसफाई न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे काम महापालिका का करत नाही?, असा संतप्त सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.
तरी पावसामुळे होणारे दुष्परिणाम, दुर्घटना, आर्थिक नुकसान व नागरिकांना होणार त्रास टाळण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्तांनीही या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला… pic.twitter.com/KU5ggFthNm
— Supriya Sule (@supriya_sule) June 11, 2024
“पुण्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसात खूप ठिकाणी पाणी साठले आहे. या घटना सातत्याने घडत आहे. पाणी तुंबलेल्या ठिकाणांची मंगळवारी आम्ही पाहणी केली. नाल्यावरून रस्ते गेले आहेत, त्यामुळे पाणी जायला जागाच राहिलेली नाही. परिणामी पाणी तुंबत असून लोकांच्या घरांमध्ये पाणी जात आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पुणे शहरामध्ये पहिल्याच पावसात पुणेकरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेऊन पुणे महानगरपालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/sVoiX31vY6
— Supriya Sule (@supriya_sule) June 11, 2024
कल्याणीनगर अपघात प्रकरणात देखील ससूनमध्ये रक्त बदलले जाते. आणि आता पाणी तुंबून रस्त्यांना ओड्याचं स्वरूप येण्याची घटना देखील पुण्यातच घडत आहे. या सर्वांची नैतिक जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुण्याकडे लक्ष द्या, अशी विनंती करणार आहे, असेही सुप्रिया सुळे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारात मिळणार ‘हे’ १५ पदार्थ
-‘ही तर तात्पुरती सूज’; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर
-पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्याने काय होते? जितके फायदे तितकेच तोटेही
-साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार