बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री दौऱ्यावर असताना एका मेळाव्यात बोलताना ‘मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावरच आता खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजित पवारांनी मोक्का लागण्यापासून एखाद्याला वाचवलं असेल तर हे धक्कादायक आहे. याचं सरकारने उत्तर द्यायला हवं’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमकं कोणाला वाचवलं? कोणत्या केसमधून वाचवलं?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणं कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचं उत्तर द्यायला हवं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
“आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. मला अधिकारी म्हणाले, दादा तुम्ही एवढं कडक वागतात आणि अशा गोष्टीला कसं पाठीशी घालतात? तेव्हा माझा पण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते”, असं अजित पवार बारामतीत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
-उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या महत्वाची पत्रकार परिषद
-‘पुण्यात वॉशिंग मशीन नकोच’; शरद पवारांनंतर वसंत मोरे राऊतांच्या भेटीला
-‘निलेशला मीच पक्षात आणलं, मनापासून आधार दिला’; लंकेंच्या पक्षप्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया
-“माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजितदादा गटाला इशारा