पुणे : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील जनतेसाठी अनेक विविध योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी सर्वाधिक चर्चेची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’. राज्य सरकारच्या या योजनेवरुन विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या लाडकी बहिण खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावरुन टीका केली आहे. ‘अजित पवारांवरील भष्ट्राचाराच्या आरोपांचे उत्तर भाजपनेच द्यावे’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
“अजित पवार यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपावर महाविकास आघाडी उत्तर देऊ शकत नाही, तर महायुतीने उत्तर दिले पाहिजे. कारण अजित पवार यांच्यावर आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनी अजित पवारांवर आरोप केले. त्यामुळे याचे उत्तर त्यांनाच विचारले पाहिजे”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
“सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? याचा विचार सरकारने केला पाहिजे. ज्या प्रकारे सरकार कर्ज घेत आहे, निवडणूक समोर असल्याने सरकार फक्त जुमल्यांचा पाऊस पाडत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैसे वापरायचे, सत्तेत यायचे असे सुरु आहे. सरकारने गरीबांची मदत केली पाहिजे. पण किती कर्ज घ्यावे? आता बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पाहा. बुलेट ट्रेन कोणीही मागितली नव्हती. या सर्वांचा विचार व्हायलाच पाहिजे. मला तरी हा अर्थसंकल्प पाहून काहीही आश्चर्य वाटले नाही”, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; छोटा राजनच्या नावाने धमकावणं पडलं महागात, नेमका काय प्रकार?
-अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपावर अजित पवारांचं सणसणीत उत्तर; म्हणाले, ‘मी स्पष्टच सांगतो…’
-पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच घेतला बळी, निघाला कोयता गँगचा मेंबर
-टिंडर डेंटिंग अॅपवरची ओळख महिलेला पडली महागात; वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने बलात्कार
-पुणे कार अपघात प्रकरण: अखेर २ महिन्यांनंतर बिल्डर पुत्राने लिहला ३०० शब्दांत निबंध