पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्टेशन समोर वाहतूक नियंत्रण ड्युटीवर कार्यरत असलेल्या महिला अधिकारीने मध्यप्राशन केलेल्या आरोपीला हटकलं आणि कारवाई करताना आरोपीने थेट महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंतपणे जाळण्याचा भयानक प्रयन्त केला आहे. या प्रकारावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्हची कारवाई सुरु असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. थेट पोलीसांवर हात टाकेपर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्ह… https://t.co/Q09WUklhIY
— Supriya Sule (@supriya_sule) July 6, 2024
एकिकडे अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून दुसरीकडे सर्वसामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली जगतोय ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री महोदय, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलीसांवरील हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे, असेही सुप्रिया सुळे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रिक्षा चालकांसाठी आमदार सिद्दार्थ शिरोळेंनी विधानसभेत केली ‘ही’ महत्वाची मागणी
-ऑन ड्युटी महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकलं पेट्रोल अन्… पुण्यात नेमकं चाललंय काय?
-‘आता सर्वांना वारीच्या पालखीत फिरायचंय, पण…’; अजित पवारांचा शरद पवारांना टोला
-‘दादांवर मोदी, फडणवीसांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्यामुळे…’; सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला
-विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; छोटा राजनच्या नावाने धमकावणं पडलं महागात, नेमका काय प्रकार?