पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार हे दोन गट पडले. यावरु निवडणूक आयोगाने निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी देखील निर्यण दिला. या निर्णयाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालं. त्यावरुन आता शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायलयामध्ये धाव घेतली. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने अजित पवार गटाची मागणी फेटाळली. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला आठवड्यात चिन्ह देण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाला केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
“पक्ष-चिन्ह, आमदार सगळेच घेऊन गेलात”
‘लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा अधिकार संविधनाने दिला आहे. शरद पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह द्यायचे नाही, ही एक प्रकारची दडपशाही नाही का? पक्ष, चिन्ह, आमदार सगळेच घेऊन गेला आहात आणि आता वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा अधिकार आम्हाला नाही का?’ असा भावनिक सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केला आहे.
‘गेली सहा दशके राज्यातील जनता शरद पवार यांच्या पाठिशी उभी आहे. ८३ वर्षाच्या योद्ध्याने स्थापन केलेला पक्ष तुम्ही काढून घेतला. त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, तर चिन्ह मिळू द्यायचे नाही, असा रडीचा डाव का खेळता. शरद पवार यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे की नाही? आम्ही दुसरे काही करायचेच नाही का? आमचे ‘करिअर’ उद्धवस्त झाले तरी चालेल? ही दडपशाही नाही का? असा प्रकार देशाच्या इतिसाहात प्रथमच घडला आहे’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
‘पाकिस्तानात काय चालले आहे, ते बघा. आपल्याकडे असे व्हायला नको,’ या शब्दांत न्यायालयाने अजित पवार गटाच्या वकिलांना उद्देशून केलेली टिप्पणी दुर्देवी आहे. महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी होत आहे,’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याचा दादा कोण?; रोहित पवारांच्या बॅनरची राजकारणात मोठी चर्चा
-चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल
-प्रशासनराज पुण्यात फेल? ‘सीएमओ’ तक्रारीवर कानउघडणी होताच पालिकेची धावपळ
-पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५५ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त