पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर २ गट पडले. हा राजकीय वाद न राहता आता तो कौंटुबिक वाद झाला आणि तो चव्हाट्यावर आला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा असलेला मतदारसंघ म्हणजे बारमती लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेला अजित पवारांनी दुजोरा दिला.
सुनेत्रा पवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्या तरीही त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या नेत्यांना निवडणूक चांगली माहिती असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंना अजित पवार आणि त्यांच्या गटाने टीकेचे लक्ष्य केले होते. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. पुण्यातील वडगाव येथील सभेत बोलताना, सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
‘माझ्या नवऱ्याने भाषण केलेलं चालेल का? संसदेत मी जाणार की माझा नवरा? नवऱ्याला संसदेत (येणं) अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? (मी) सदानंद सुळे यांना पाठवते, ते भाषण करतील. पण, सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे. मलाच लढायचं आहे’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
‘माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे? नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं. पर्स सांभाळत कॅन्टीनमध्ये बसावं लागतं’, असा सणसणीत टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
सुनेत्रा पवारांसाठी मतदारसंघात फिरणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले. ‘मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं, असं कॉपी करून पास नाही होणार, मै सुप्रिया सुळे हूं..खुद करुंगी और खुद पास हुंगी’ अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठरलं! बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं A टू Z गणित
-धंगेकरांनी आव्हान देऊ नये, त्यांचा पराभव करायला फडणवीसांचा हा चेलाच भारी- काकडे
-Pune Drugs Racket: ड्रग्ज मालिका काही संपेना; कोंढव्यात सापडले २ किलो ड्रग्ज
-पुण्यातील मार्केट यार्ड आज शांत; कामगार संघटनांकडून बंदची हाक
-“कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसणे असा…”; अजित पवारांनी जनतेला लिहलं पत्र