पुणे : आज माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा स्मृतिदिन आहे. बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा दिला. सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीमधील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आर. आर. आबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर विविध मुद्यांवर देखील भाष्य केले.
१६ फेब्रुवारी हा माझ्यासाठी इमोशनल दिवस असतो कारण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवस असतो. १६ फेब्रुवारीचा तो दिवस आजही आठवतो, लीलावती हॉस्पिटल मुंबईत आहे, त्याबाहेरुन जात असते त्यावेळी तो क्षण आयुष्यभर विसरु शकत नाही. आबांचे बंधू आणि मी त्यांच्यासमोर होतो. डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते, आबांचे बंधू कोलॅप्स झाले, त्यांना बसवलं आणि पाणी दिलं. त्यानंतरची पुढची पाच मिनिटं माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड आणि अडचणीची होती. तीन साडे तीन वाजले होते, डोळे बंद केले की तो क्षण काल झाल्यासारखं माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो, असं सांगत सुप्रिया सुळे आबांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षण सांगताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या.
आर. आर. पाटील यांचे हार्ट बिट ८० वरून शून्य वर आलेलं मी माझ्या डोळ्याने पाहिलं. आबा जेव्हा गेले तेव्हा मी एकटी तिथं उभी होते. वहिनी आणि त्यांची मुलगी मंदिरात गेलेल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाला कळत होतं, खूप अडचणीचा काळ आहे. त्या दोघी प्रार्थना करत होत्या. आबांचे बंधू कोलॅप्स झालेले आणि ओक्साबोक्सी रडत होते. तिथं समोर मी उभी होते, लीलावतीच्या डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले पण आबांना वाचवू शकलो नाही, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.
तो दिवस आणि आजचा दिवस, जेव्हा जेव्हा लीलावतीवरुन जाते तेव्हा आबांची आठवण येते. दरवेळेस आयुष्यात प्रश्न आला, संघर्षाची वेळ आली की आबांची आठवण येते. रोहित दिसला, वहिनी भेटल्या की आबांची आठवण येते. आबांनी खूप साथ दिली. आबांचं योगदान, प्रेम, नातं आयुष्यभर विसरणार नाही. हक्काचा मोठा भाऊ कॅन्सरनं गमावला. सुमनवहिनी त्या एवढा मोठा प्रश्न आल्यानंतर, दु: ख कोसळल्यानंतर त्या राज्याच्या सेवेसाठी घराबाहेर आल्या. सुमनवहिनी आमच्यासाठी आदर्श आहेत. रोहित काम करतो त्यातून आबा दिसतात असं वाटतं पण आबांची पोकळी कोणीही भरुन काढू शकणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-मेधा कुलकर्णींच्या राज्यसभेमुळे मोहोळांचा मार्ग मोकळा, नेमकं गणित काय?
-बारामती मतदारसंघातून महत्वाची अपडेट; सुनेत्रा पवार कांचन कुल यांच्या भेटीला
-रक्षकच बनले भक्षक; गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी उकळले पैसे
-भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि दबावतंत्र; रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप