पुणे : राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडी उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजई एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या १८ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचादेखील १८ एप्रिललाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे. १८ एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार या देखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“ही भावकीची निवडणूक नाही, १४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे”- अजित पवार
-Maval Lok Sabha | “बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”; संजोग वाघेरेंनी बारणेंना दिली रावणाची उपमा
-Baramati Lok Sabha : अजितदादांची नवी चाल? बारामतीच्या हाय होल्टेज लढतीत अजितदादांची एन्ट्री
-आज भवानीमातेचा प्रकट दिन; जाणून घ्या आजच्या दिवसाचे काय महत्व?
-“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी