बारामती : गेल्या कित्येक वर्षांपासून बारामतीवर पवारांचे वर्चस्व असून गेल्या काही महिन्यांपासून याच पवार कुटुंबामध्ये मोठी फूट पडली आहे. यंदा झालेल्या लोकसभा निवडणूक आणि आताच्या विधानसभा निवडणुकीत या कुटुंबातील लोक आमनेसामने पहायला मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतल्याचे पहायला मिळाले. आणि त्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनी पराभव केला. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंब आमने सामने आले आहेत.
अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा सामना या निवडणुकीत रंगला आहे. राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला असं आजवर पहायला मिळालं. मात्र आज बारामतीमध्ये वेगळंच चित्र दिसलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरुन सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
‘माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे या दोघी बारामतीतल्या टेक्सटाइल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबवून ठेवण्यात आल्याची मला माहिती कळाली आहे. ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभं केलं, त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्या ठिकाणी थांबवलं जातंय. आता सत्ता आहे म्हणून हे ठीक आहे, ते लोकांना कसेही वागवू शकतात’, अशी आक्रमक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली..!
देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही.ह्या… pic.twitter.com/11NapIKNc0
— महाविकास आघाडी Official (@MahavikasAghad3) November 17, 2024
प्रतिभा पवार आणि रेवती सुळे शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये आल्या होत्या. त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर अडवण्यात आली. त्याचबरोबर गेट पुढे केलं असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. तर गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाला त्यांनी याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी जास्त काही उत्तर दिली नसल्याचं दिसून आलं. ‘आम्हाला वरुन आदेश आलेत, फोन आला, त्यामुळं गेट लावलं आहे’, असं गेटवर तैनात असलेला सुरक्षारक्षकाने सांगितल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. जवळपास अर्ध्या तास ताठकळत बसल्यानंतर सुरक्षारक्षकाने प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना आतमध्ये सोडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
-‘हिंदुत्ववादी सरकार म्हणून समाज अन् देश सुरक्षित’- गोविंद देवगिरी महाराज
-“माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, तुझ्या त्या…”, शरद पवारांचा फोटो वापरल्याने सुळे आक्रमक
-“बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल”
-“देश विश्वगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम”- नितीन गडकरी
-पर्वती मतदारसंघासाठी ‘विकासाची दशसूत्री’ ठरणार दिशादर्शक- आबा बागुल