पुणे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांची मागणी मान्य केली नाही.
याउलट सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. या परिपत्रकात तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरु नका, अशा सूचना द्याव्यात. तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
घड्याळ हे चिन्ह गोठवून अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार मागील सुनावणीमध्ये ‘घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात अजित पवारांनी वर्तमानपत्रात द्यावी’, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आजच्या सुनावणीवेळी अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
‘तुम्ही दोघांनी आपापल्या युद्धभूमीवर लक्ष केंद्रित करा. व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो. दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असे नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभेत अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय’; अजित पवारांचं प्रचारसभेत वक्तव्य
-रासनेंच्या विजयासाठी तरुणांची फौज मैदानात; तरुणाईचा भाजपला मिळतोय पाठिंबा
-पर्वतीत आबा बागुलांची प्रचारात सरशी; घराघरात ‘हिरा’चीच चर्चा
-पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; शरद पवारांच्या आमदाराचा मोदींना सल्ला