मावळ : मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगला होता. या लढतीमध्ये महायुतीचे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी ९६ हजारांचे मताधिक्य घेत ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. मात्र, श्रीरंग बारणेंना मतदारासंघातील अनेक ठिकाणाहून कमी मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे यावरुन महायुतीमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. ‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा १०० टक्के प्रचार केला नाही’, असा दावा बारणेंनी निकालापूर्वी केला.
या दाव्यानंतर बारणेंच्या उमेदवारीला विरोध करणारे अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्यावर पलटवार केल्याचे पहायला मिळाले आहे. “महायुतीचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणेंबाबत मावळ विधानसभेत नाराजीचा सूर होता. बारणेंचे मताधिक्य घटण्यामागे हे एक प्रमुख कारण होते” असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.
दरम्यान, बारणेंकडे मताधिक्याबाबतची माहिती त्यांच्याकडे होती तर मतदानाआधीच द्यायला हवी होती. पण आता निवडणूक निकालात कुठे मताधिक्य कमी होईल, याचे खापर कोणावर तरी फोडायचं किंवा अपयश लपवायचे काम बारणेंनी करु नये, असेही सुनील शेळके म्हणाले आहेत. बारणेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आधापासून नाराजी होती. आणि याच नाराजीचे परिणाम निवडणूक निकालावर झाल्याचे देखील बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस -वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे वारकरी संघटनेचं मोठं पाऊल
-चंद्रकांत पाटलांकडून पावसाळापूर्व कामांचा आढावा; ‘ही’ कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या मंत्र्याचे शरद पवार गटात होणार कम बॅक?