पुणे : महायुतीतील मावळ विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. तसेच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रस्ताव ठेवला होता मात्र भाजपने फेटाळून लावला आहे. पक्षाने एबी फॉर्म दिला असताना देखील भाजपने उमेदवारी अर्ज दाखल नाही, असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.
अजित पवार गटातील बंडखोर बापू भेगडे यांना भाजप, शरद पवार गट तसेच सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याने मावळ पॅटर्न राबवल्याची चर्चा आहे. यावर आता सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली असून “हा कसला मावळ पॅटर्न, हा तर फक्त चार कुटुंबाच्या हिताकरिता राबविण्यात आलेला पॅटर्न आहे”, अशी टीका केली आहे.
भाजप हा चुकीचा पायंडा पाडत आहे. भाजपला याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील. ही निवडणूक मावळच्या पुढच्या पाच वर्षांच्या व्हिजनची आहे. मी मावळच्या जनतेच्या साक्षीने या निवडणुकीला सामोरा जातोय. मी पाच वर्षे केलेल्या कामाची पावती येथील जनता मला देईल. मावळमधूम महायुतीचा उमेदवारच निवडून येईल. उद्या मावळवमध्ये कमळ किंवा घड्याळ कोणत्याही चिन्हाचा उमेदवार विजयी झाला तरी मला चालेल. या निवडणुकीत एका विशिष्ट आडनावाच्या लोकांना उभे करुन जिंकण्याचा प्रयत्न आहे”, असा आरोप सुनील शेळके यांनी केला आहे.
भाजपने सुनील शेळकेला संपवायचा विडा उचलला आहे. मला त्यांना आणि माझ्या माहितीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगायचं आहे की, भाजपचा कार्यकर्ता जर उमेदवार असता तर तो नक्कीच आम्ही देखील मान्य केला असता. अजून एक खुलासा करतो काल अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी जी काही परिस्थिती आहे, ती सांगितली, लक्षात आली आणि त्यावर दोघांनी निर्णय घेतला जर सुनील शेळकेंबरोबर भाजपचे कार्यकर्ते काम करत नसतील, तर आपण मैत्रीपूर्ण लढायला मदत करू. मैत्रीपूर्ण या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मग काल रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांना भाजपची उमेदवारी देण्याचे फडणवीसांनी जाहीर केल्याचे शेळकेंनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’
-“मी साहेबांना दैवत मानलं, तरीही…”; शरद पवारांनी केलेल्या नकलेवर अजितदादांची प्रतिक्रिया
-आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
-“घर फोडण्याचं पाप माझ्या…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले
-फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा