मावळ : भाजपचा बालेकिल्ला म्हणून मावळ मतदारसंघाची ओळख आहे. या निवडणुकीत मावळ मतदारसंघावर भाजपने सुरवातीपासूनच दावा केला आहे. मात्र महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी घोषित केली. आज सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे आता तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत.
तालुक्यातील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे तालुक्यात मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्ष घेतल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे. बापूसाहेब भेगडे यांच्या या निर्णयामुळे संत तुकाराम साखर कारखाना अडचणीत येऊ शकतो, अशा चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु आहेत.
अजित पवार यांनी संत तुकाराम कारखान्याने दिलेला दर कमी असल्याबाबत टीका केली होती. आता बापूसाहेब भेगडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने अजूनच राजकीय वातावरण तापले आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच शेतकऱ्यांमध्येही नारीजचा सूर उमटला आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेदांमुळे संत तुकाराम साखर कारखाना आणखी संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी वर्गाने यावर आपले मत व्यक्त करत, “कारखाना अडचणीत आला तर आम्ही बापूसाहेबांची साथ सोडू,” असे सूचित केले आहे. तालुक्यातील राजकीय हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढे काय घडणार? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?
-Ambegaon: ‘वळसे पाटलांमुळे माझं जगणं कठीण झालंय’ उमेदवारी अर्ज भरण्याआधी आंबेगावात राजकीय राडा
-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरेना! इच्छुकांचा जीव टांगणीला
-बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?
-दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील? इंदापूरात तिसऱ्यांदा होणार काँटे की टक्कर!