पुणे : लोकसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्येच जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांना साद घातली जात आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. देवधर यांनी आज ‘नमो पुणे अभिवादन बाईक रॅली’चे आयोजन करत राजकीय वातावरण निर्मिती केल्याचं दिसून आलं. यावेळी पुण्यातील राजकीय वर्तुळात कायम चर्चेचा असणाऱ्या पुण्येश्वर मंदिराचा विषय पुढे आणला आहे.
यावेळी बोलताना देवधर म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभे राहू शकले असून, ज्याप्रमाणे देशाला राम मंदिर मिळाले, त्याप्रमाणे पुणेकरांना देखील पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे, पुण्यातील नागरी समस्यांचे निराकरण, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध असून, पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार”
डीपी रोडवरील भाजप कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली तर मॉडर्न इंजिनिअरिंग महाविद्यालयाजवळ समारोप करण्यात आला. यावेळी भाजपचे कुणाल टिळक, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप शहर चिटणीस महेश पवळे, दिनेश होले यांच्यासह हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला.
महत्वाच्या बातम्या-
-“महाराष्ट्र या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”- शरद पवार
-‘कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत?’; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
-वागळे प्रकरणाच्या हल्लेखोरांची परेड का काढली नाही? राऊतांचा राज्य सरकारला सवाल
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार; पोलीस दलात खळबळ
-पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं