पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता सुनेत्रा पवार यांनी दौंडमध्ये सोमवारी निवडणूक लढण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. अजित पवार सुनेत्रा पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दौंड मर्चंट असोसिएशन, पतित पावन संघटना, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या व्यापारी बैठकीत सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
‘काल इंदापूरमध्ये दादांनी सांगितलं आहे की, आपल्या विचाराचा खासदार द्या. आता तुम्ही समजून घ्यायचे ते घ्या’, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. ‘बारामतीकरांचे पाठबळ कायमस्वरूपी राहणार आहे. अजितदादांवर बारामतीकरांचे प्रेम आहे’, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
सध्या बारामतीत सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. अशातच ‘बारामतीकर आपल्यालाच साथ देणार’ असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“शरद पवारांमुळेंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, बारामती २३ मार्चला मोर्चा…”
-“नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं”
-ठरलं! बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं A टू Z गणित
-धंगेकरांनी आव्हान देऊ नये, त्यांचा पराभव करायला फडणवीसांचा हा चेलाच भारी- काकडे
-Pune Drugs Racket: ड्रग्ज मालिका काही संपेना; कोंढव्यात सापडले २ किलो ड्रग्ज