पुणे : महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार या दौंड दौऱ्यावर असताना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास लिंगाळी गावात गेल्या असता गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करत बैलगाडीतून मिरवणूक काढली. त्यातच लिंगाळी गावातील सर्व गावकरी महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. गावकऱ्यांनी मनापासून केलेले स्वागत नम्रपणे स्वीकारून सुनेत्रा पवार यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोळीवाडी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी वाघजाई मंदिरामध्ये नागरिकांनी त्यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधत आपल्या अडचणी सांगितल्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची टंचाई असल्याचे नागरिकांनी सांगितले.
‘लवकरच आपण ही अडचण दूर करू’ असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी नागरिकांना दिला आहे. ‘महायुतीला प्रचंड बहुमत द्या’ असे आवाहनही नागरिकांना केले.
महत्वाच्या बातम्या-
-‘आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ द्या, उद्याच मंत्री करतो’; अजित पवारांचं वक्तव्य
-‘महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होतेय, आपणही मतदान करून सामील व्हावे’; सुनेत्रा पवारांचे आवाहन
-मावळमध्ये संजोग वाघेरेंना शह देण्यासाठी नाशिकच्या संजय वाघेरेंची एन्ट्री!
-बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचे हॉट फोटोशूट; नेटकऱ्यांनी केले जोरदार कौतुक!
-हजारोंची गर्दी अन् दिग्गजांची उपस्थिती! आढळराव पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज