पुणे : उन्हाळ्यामुळे वातावरण गरम होत असताना लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण देखील चांगले तापताना दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार काका पुतण्यामध्ये सुरू असणारी लढाई दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर देण्यात आला आहे. आज सुनेत्रा पवार या रखरखत्या उन्हामध्ये धायरीत पोहचल्या, यावेळी महिलांनी त्यांचे जंगी स्वागत केलं आहे.
आपल्या विरोधी उमेदवार, महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचारात अत्यंत सुसूत्रता दिसून येत आहे. रोज गावभेटी देणे, नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम सुनेत्रा पवार करत आहेत. अशातच आज त्या धायरी दौऱ्यावर असून धायारीतील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पुण्यातील उष्णतेचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला आहे. मात्र रखरखत्या उन्हातही सुनेत्रा पवार यांना पाठींबा देण्यासाठी धायरीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ढोल-ताशांच्या गजरात सुनेत्रा पवार यांचे धायरीत स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी धायरीतील रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते. सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा असल्याचा विश्वास मतदारांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे
-एक आवाहन अन् हेमंत रासने यांच्या वाढदिवसाला संकलित झाल्या तीस हजार वह्या
-धंगेकरांना आणखी एक धक्का, काँग्रेसचे निष्ठावान आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला; नेमकं घडलं काय?